महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मांजरसुंबा घाटात इंधनाने भरलेल्या टँकरला भीषण आग, चालकाचा होरपळून मृत्यू - धुळे सोलापूर महामार्गावर टँकरने घेतला पेट

धुळे-सोलापूर महामार्गावर आज (बुधवार) इंधन घेऊन जाणारा एक टँकर पलटी होऊन आग लागली. या आगीत टँकर चालकाचा होरपळून मृत्यू झाला. तर अन्य एक जण जखमी झाला आहे.

Fuel tanker overturns, catches fire on solapur-Dhule high way
मांजरसुंबा घाटात इंधनाने भरलेल्या टँकरला भीषण आग, चालकाचा होरपळून मृत्यू

By

Published : May 20, 2020, 3:20 PM IST

Updated : May 20, 2020, 4:46 PM IST

बीड- धुळे-सोलापूर महामार्गावर आज (बुधवार) इंधन घेऊन जाणारा एक टँकर पलटी होऊन आग लागली. या आगीत टँकर चालकाचा होरपळून मृत्यू झाला. तर अन्य एक जण जखमी झाला आहे. ही घटना बीड जवळील मांजरसुंबा घाटात घडली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली.

अपघातानंतर टँकरला लागलेली आग...

इंधनाने भरलेला एक टँकर सोलापुरहून बीडकडे निघाला होता. मांजरसुंबा घाटात आल्यानंतर तो पलटी झाला. टँकर पलटी होत असल्याचे पाहून त्यात बसलेल्या एकाने टँकर बाहेर उडी टाकली. पलटी होताच टँकर त्याच्यातील इंधनामुळे पेट घेतला. या आगीने काही क्षणातच रुद्र रुप धारण केले. या आगीत टँकर चालकाचा होरपळून मृत्यू झाला.

या अपघातात जखमी झालेल्या नागरिकाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अद्याप मृत चालकासह जखमीचे नाव समजू शकलेले नाही. या अपघातामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली आहे.

हेही वाचा -सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे राज्यातील गावे असुरक्षित - आमदार सुरेश धस
हेही वाचा -बीडमध्ये डॉक्टरांचा ठिय्या; आयसोलेशन कक्षात सुविधांचा अभाव असल्याचा आरोप

Last Updated : May 20, 2020, 4:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details