धुळे- जिल्ह्यात १८ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी तब्बल १८ रुग्णांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 52 झाली आहे.
धुळ्यात एकाच दिवशी 18 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह. एकूण संख्या 52 वर - dhule news
जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 52 झाली आहे.
धुळ्यात १८ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 52 झाली आहे. त्यात एसआरपीएफच्या सात जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच गुरूवारी देवपूर परिसरातील बाधित डॉक्टरच्या संपर्कातील चारजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच अमळनेर येथील एका व्यक्तीचादेखील अहवाल पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या १८ रुग्णांमध्ये १४ पुरूष तर चार महिलांचा समावेश आहे. तर, कोरोनाबाधितांची संख्या आता ५२ झाली आहे.