महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 5, 2020, 5:12 AM IST

ETV Bharat / state

धक्कादायक; एकाच दिवशी 18 जणांचे अहवाल आले 'पॉझिटिव्ह', प्रशासनात खळबळ

धुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 192 वर जाऊन पोहोचला आहे. तर आत्तापर्यंत 92 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 21 जणांचा मृत्यू झाला. तब्बल अठरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

Dhule
प्रतिकात्मक छायाचित्र

धुळे- गुरुवारी रात्री तब्बल अठरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 192 वर जाऊन पोहोचला आहे. तर आत्तापर्यंत 92 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 21 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान शुक्रवारपासून शहरातील व्यावसायिकांची दुकाने उघडण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. यामुळे कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

धुळे जिल्ह्यात गुरुवारी रात्री एकूण १८ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाला आहे. त्यात जिल्हा रुग्णालय धुळे येथील ४ अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील ३२ अहवालांपैकी १४ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झालेत.

धुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 192 झाली असून यापैकी 92 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 21 जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details