महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यात 44 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 12 जणांना डिस्चार्ज

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तपासणीचे प्रमाण वाढविण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार शहरातील मोगलाई परिसर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला असून या भागातील 20 जण कोरोनाग्रस्त झाले आहेत. मागील 30 दिवसांत जिल्ह्यात 451 कोरोना रुग्णांची भर पडली आहे.

new corona cases in dhule
धुळ्यात 44 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

By

Published : Jun 23, 2020, 3:11 PM IST

धुळे- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशात आज आणखी ४४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. तर, विविध रुग्णालयातून आज 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६१० झाली आहे. आतापर्यंत धुळ्यातील 3३९ जणांनी कोरोनावर मात केली असून 48 जणांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित २२३ जणांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तपासणीचे प्रमाण वाढविण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार शहरातील मोगलाई परिसर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला असून या भागातील 20 जण कोरोनाग्रस्त झाले आहेत. मागील 30 दिवसांत जिल्ह्यात 451 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. एका महिन्यात 5 पटीने रुग्ण वाढले आहेत. ग्रामीण भागातदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून शिरपूर तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. शिरपूर तालुक्यात 151 कोरोना रुग्ण आढळले असून 72 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यभरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. रविवारी राज्यात 3 हजार 870 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 170 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 60 हजार 147 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, 1 हजार 59 रुग्णांनी रविवारी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details