महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे अडचणीत - राज्यातील 70 जणांवर गुन्हे दाखल

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंमलबजावणी संचालनालयाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील 70 जणांवर गुन्हे दाखल केले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी हे गुन्हे दाखल केले आहेत. याचे वृत्त मंगळवारी प्रकाशित झाले.

माजी आमदार राजवर्धन कदमबांडे

By

Published : Sep 25, 2019, 7:05 PM IST

धुळे- महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह 70 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये धुळे शहरातील राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचादेखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. राजवर्धन कदमबांडे यांच्यावरील या कारवाईमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरण बदलतात का ? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

हेही वाचा-उरणमधील ओएनजीसीमध्ये पुन्हा वायू गळती; नागरिकांमध्ये घबराट

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंमलबजावणी संचालनालयाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील 70 जणांवर गुन्हे दाखल केले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी हे गुन्हे दाखल केले आहेत. याचे वृत्त मंगळवारी प्रकाशित झाले. या वृत्तामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. या कारवाईत धुळे शहराचे माजी आमदार आणि बँकेचे तत्कालीन संचालक राजवर्धन कदमबांडे यांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यासंदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची चर्चा देखील सुरू होती. मात्र, या कारवाईमुळे त्यांची आता भाजपमध्ये जाण्याची शक्यता मावळली आहे. मात्र, असे असले तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यावर कारवाईचा फास आवळला गेल्याने या निवडणुकीत धुळे शहराचे राजकीय समीकरण बदलते का ? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

हेही वाचा-MAHA VIDHAN SABHA : एकही महिला आमदार न झालेली निवडणूक.. शिवसेनेचा चंचूप्रवेश व सहकार चळवळीचा पाया

राजवर्धन कदमबांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर भाजपसह विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षावर कडाडून टीका केली जाऊ शकते. यामुळे राजवर्धन कदमबांडे यांच्यासाठी भाजपचे दरवाजे आता पूर्णपणे बंद झाले आहेत. धुळे शहरात 60 टक्के मराठा मतदार आहेत. या कारवाईमुळे राष्ट्रवादीला मिळणारी सहानुभूती लक्षात घेऊन राजवर्धन कदमबांडे हे राष्ट्रवादी पक्षाकडूनच उमेदवारी करू शकतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे शहरात भाजपला धक्का देण्यासाठी राष्ट्रवादीकडून नवी खेळी खेळली जाऊ शकते. धुळे शहराची राजकीय समीकरण नेमकी कसे बदलतात? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details