धुळे -निवडणुकीच्या काळात नेहेमीच चर्चेत असणारे माजी आमदार अनिल गोटे यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत अपक्ष उमेदवारी लढवली आहे. निवडणुकीत मतदान पार पडल्यानंतर गोटे यांनी ईव्हीएम मशीन मतमोजणी केंद्रापर्यंत घेऊन जाणाऱ्या वाहनांचा पाठलाग केला होता. आता, ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन मतमोजणीपर्यंत ठेवण्यात आले आहेत त्या ठिकाणी स्वतः रात्री साडेतीन वाजता पोहोचून मतमोजणी होईपर्यंत पहारा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मशीनमध्ये विरोधकांकडून कुठलीही हेरफेर होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे गोटे यांनी सांगितले.
माजी आमदार अनिल गोटे मतमोजणीपर्यंत देणार ईव्हीएम मशीनजवळ पहारा - धुळे मतमोजणी
ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन मतमोजणीपर्यंत ठेवण्यात आले आहेत, त्या ठिकाणी स्वतः पोहोचून मतमोजणी होईपर्यंत पहारा देणार असल्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी स्पष्ट केले आहे. मशीनमध्ये विरोधकांकडून कुठलीही हेरफेर होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे गोटे यांनी सांगितले.
हेही वाचा -'ईटीव्ही भारत'च्या बातमीनंतर धुळ्यातील तरुणावर गुन्हा दाखल
गोटे यांनी, निवडणुकीदरम्यान विरोधकांनी आपल्याला मारण्याचा कट केला असल्याचा खुलासाही केला होता. विरोधक त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याच्या तयारीत होते आणि त्यातून ते थोडक्यात बचावले, असा दावा त्यांनी केला होता. याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली असता पोलिसांनी संबंधीत ठfकाणी छापा टाकून पन्नास हजारांची रोख रक्कम आणि पिस्तुल सदृश्य वस्तू जप्त केली होती. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.