धुळे - साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणातून 58000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पांझरा नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे. शहरातील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या गावांना तसेच शहरातील वसाहतींना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धुळे: पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत - धुळे जनजीवन पूर्वपदावर
साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणातून 58000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पांझरा नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे. शहरातील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या गावांना तसेच शहरातील वसाहतींना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पूर परिस्थिती पाहता शहरातील ब्रिटिशकालीन मुख्य मोठा पूल देखील बंद करण्याचा निरणय घेण्यात आला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता तसेच अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे असे आवाहन शहर प्रशासन करत आहे. जिल्ह्यात साक्री तालुक्यात यंदा सर्वाधिक पाऊस झाल्याने अक्कलपाडा धरण 100% भरले आहे.
दरम्यान, शुक्रवारीदेखील 58000 क्युसेक पाण्याचा विसर्ग पांझरा नदी पात्रात करण्यात आला होता. यामुळे पांझरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने धुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. शनिवारी हा पूर ओसरून जनजीवन पूर्वपदावर आले होते. पुरामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल प्रशासनाला सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, पुन्हा एकदा अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे पुरस्थिती गंभीर होण्याचे संकेत आहेत.