धुळे- जिल्ह्यातील साक्री जवळील खुडाने येथे शॉर्ट सर्किटमुळे चाऱ्याने भरलेल्या ट्रॅक्टरला आग लागली. यात चारा आणि ट्रक्टर दोन्ही जळून खाक झाले आहेत. या घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र, ट्रॅक्टर जाळाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. ग्रामस्थांना ही आग विझवण्यात यश आले आहे.
धुळ्यात चारा भरलेल्या ट्रॅक्टरला शॉर्ट सर्किटमुळे आग, चाऱ्यासह ट्रॅक्टर जळून खाक - आग
जिल्ह्यातील साक्री जवळील खुडाने येथे शॉर्ट सर्किटमुळे चाऱ्याने भरलेल्या ट्रॅक्टरला आग लागली. यात चारा आणि ट्रक्टर दोन्ही जळून खाक झाले आहेत.

धुळ्यामध्ये शार्टसर्किटमुळे चारा भरलेल्या ट्रॅक्टरला आग
धुळे जिल्ह्यातील साक्री येथून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या खुडाणे गावातील देविदास गणपत माळी या शेतकऱ्याने जनावरांसाठी चारा विकत घेतला होता. तो चारा ट्रॅक्टरमध्ये भरून घराकडे आणताना वीजेच्या तारेमुळे शॉटसर्किट झाले आणि चाऱ्याला आग लागली. चारा वाळलेला असल्याने त्याने पटकन पेट घेतला.
धुळ्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे चारा भरलेल्या ट्रॅक्टरला आग
गावकऱ्यांनी जळत असलेल्या ट्रॅक्टरकडे धाव घेत मातीच्या व पाण्याच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण चारा आणि ट्रॅक्टर जळून खाक झाले.