महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे : दोंडाईचा येथे कोल्ड स्टोरेजला आग, लाखोंचे नुकसान - केमिकल कंपनी

दोंडाईचा येथे के. एस. कोल्ड स्टोरेजला भीषण आग लागल्याची घटना आज रात्री घडली आहे. या आगीमगील कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कोल्ड स्टोरेजला आग

By

Published : Sep 2, 2019, 11:44 PM IST

धुळे- जिल्ह्यातील दोंडाईचा येथे के. एस. कोल्ड स्टोरेजला भीषण आग लागल्याची घटना आज रात्री घडली आहे. या आगीमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच याठिकाणी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

हेही वाचा - धुळे: शिरपूरच्या स्फोटाने निर्माण केले अनेक प्रश्न

ही इमारत पाच मजली असल्यामुळे फायर फायटरचे पाणीही तिथे पोहोचवणे शक्य झाले नाही. रात्री साडेआठ वाजल्याच्या सुमारास ही आग लागली. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कोल्ड स्टोरेजला आग

दरम्यान शनिवारीच धुळ्यात आणखी एक आगाची भयानक घटना घडली होती. शिरपूर तालुक्यातील वाघोडी गावाजवळ असलेल्या एका केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. स्फोट इतका मोठा होता की यात १५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते.

हेही वाचा -धुळ्याच्या केमिकल कंपनीत भीषण स्फोट; १५ ठार, 65 गंभीर

ABOUT THE AUTHOR

...view details