धुळे - जिल्ह्यात शुक्रवारी रात्री तब्बल १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून कोरोना बधितांचा आकडा २१५ झाला आहे. वाढत्या बाधितांमुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत वाढ झाली आहे.
धुळ्यात एकाच दिवशी 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह....
शुक्रवारी रात्रीपर्यंत जिल्ह्यात एकूण १२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाला होता. त्यात धुळे शहर ४ तर, शिरपूर शहरातील एकूण ८ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाला होता. मात्र, मध्यरात्री मिळालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी ७ पॉझिटीव्ह रुग्णांंमध्ये वाढ झाली आहे.
शुक्रवारी रात्रीपर्यंत जिल्ह्यात एकूण १२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाला होता. त्यात धुळे शहर ४ तर, शिरपूर शहरातील एकूण ८ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाला होता. मात्र, मध्यरात्री मिळालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी ७ पॉझिटीव्ह रुग्णांंमध्ये वाढ झाली आहे. यात दोंडाईचा, शिरपूर धुळेचा रुग्णांचा समावेश आहे. आता धुळे जिल्ह्यातील पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २१५ झाली असून यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. आतापर्यंत ९२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून तब्बल २४ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने दोंडाईचा गावात सुद्धा प्रवेश केला असून यामुळे अधिक चिंता वाढली आहे.
जिल्हा रुग्णालयातील ११ अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटीव्ह
1. स्त्री/३२ वर्ष विश्वकर्मा नगर
2. मुलगा/१८ वर्ष माधवपुरा
3. स्त्री/ ४२ वर्ष माधवपुरा
——————
उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील १० पैकी २ अहवाल पॉझिटीव्ह
1. स्त्री / ५८ वर्ष पारधीपुरा
2. पुरुष/ ४४ वर्ष पारधीपुरा
——————
उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ३ अहवालांपैकी २ अहवाल पॉझिटीव्ह
1. स्त्री / ४९ वर्ष राणीपुरा
2. पुरुष/ ४२ वर्ष दादामिल दोंडाईचा यांचा समावेश आहे.