धुळे- येथील धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून एमआयएम पक्षाचे डॉ. फारुख शहा हे विजयी झाले आहेत. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विरुद्ध महायुतीचे उमेदवार, अशी लढत रंगली होती. गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये सातत्याने विजयी होणाऱ्या अनिल गोटे यांच्या विजयाची घोडदौड अखेर एमआयएम पक्षाच्या उमेदवाराने रोखली आहे.
धुळे: एमआयएमने रोखली अनिल गोटे यांच्या विजयाची घोडदौड - धुळे निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज गुरुवारी जाहीर करण्यात आला. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून एमआयएम पक्षाचे उमेदवार डॉ. फारुख शहा हे 2 हजार 652 मतांनी विजयी झाले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज गुरुवारी जाहीर करण्यात आला. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून एमआयएम पक्षाचे उमेदवार डॉ. फारुख शहा हे 2 हजार 652 मतांनी विजयी झाले आहेत. डॉ. फारुक शहा यांनी धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांच्या विजयाची घोडदौड रोखली आहे. धुळे शहर विधानसभा मतदार संघाची संपूर्ण निवडणूकही अत्यंत चुरशीची झाली होती. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार अनिल गोटे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, शिवसेनेचे हिलाल माळी यांच्यात तिरंगी लढत होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, डॉ. फारुख शहा यांच्या रुपाने या लढतीला वेगळं वळण मिळाले होते. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात 93 हजार मुस्लिम बांधवांचे मतदान आहे. मात्र, मुस्लिम धर्मीय एकही लोकप्रतिनिधी याठिकाणी नसताना देखील धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून विजयी होण्यात डॉ. फारुख शहा हे यशस्वी झाल्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. फारुख शहा यांच्या विजयानंतर जनतेतून आता कोणत्या प्रतिक्रिया उमटतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.