धुळे- परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीला कंटाळून धुळे तालुक्यातील खंडलाय या गावातील शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने त्यांचा प्रयत्न फसल्याने ते बचावले. भालचंद्र पाटील, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धुळ्यात नुकसानीला कंटाळून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न - Farmer suicide attempt fail in dhule
धुळे तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीला कंटाळून खंडलाय गावातील शेतकरी प्रवीण भालचंद्र पाटील (वय 40) यांनी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने ते बचावले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
हेही वाचा -पावसातील भाषणावर चिमुरडीला पवारांनी काय दिले उत्तर?
धुळे तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीला कंटाळून खंडलाय गावातील शेतकरी प्रवीण भालचंद्र पाटील (वय 40) यांनी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने ते बचावले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. भालचंद्र पाटील यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच नवनिर्वाचित आमदार डॉ. फारूक शाह यांनी भेट देऊन पाहणी केली. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी भालचंद्र पाटील यांनी केली आहे.
TAGGED:
Farmer suicide attempt fail