महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्याचा तलावात बुडून मृत्यू, कावठी गावातील घटना - छोटु संतोष पाटील कावठी न्यूज

कावठी गावातील शेतकरी छोटु संतोष पाटील (वय -30)  हा गुरे चारायला गेला होता. काही वेळाने पाणी पाजण्यासाठी तो गुरांना तलाव जवळ घेऊन गेला. त्याच वेळी संतोषचा पाय अचानक घसरून तो पाण्यात पडला. संतोषला पोहता येत नसल्याने त्याने आरडाओरड केली.

शेतकऱ्याचा तलावात बुडून मृत्यू, कावठी गावातील घटना

By

Published : Nov 3, 2019, 2:49 AM IST

धुळे -गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका 30 वर्षीय शेतकर्‍याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना धुळे जिल्ह्यातील कावठी या गावात घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा -प्रेमविवाह केलेल्या मुलीला कुटुंबीयांची 'भावपूर्ण श्रद्धांजली'; रायगडमध्ये रंगले नाट्य

कावठी गावातील शेतकरी छोटु संतोष पाटील (वय -30) हा गुरे चारायला गेला होता. काही वेळाने पाणी पाजण्यासाठी तो गुरांना तलाव जवळ घेऊन गेला. त्याच वेळी संतोषचा पाय अचानक घसरून तो पाण्यात पडला. संतोषला पोहता येत नसल्याने त्याने आरडाओरड केली. तलावाजवळ असणाऱ्या लोकांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. काही लोक गावात पळत गेले आणि अन्य लोकांना तलावाजवळ मदतीसाठी घेऊन आले.

मात्र, बराच वेळ झाल्याने संतोष खोल पाण्यात बुडाला होता. तासाभराने पाण्यात शोध घेतल्यानंतर संतोषचा मृतदेह हाती लागला. नातेवाईकांच्या मदतीने संतोषला जवळील कुटीर रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन करुन पोलीसांनी संतोषचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या प्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details