धुळे- शिरपूर तालुक्यातील टेंभे येथील तरूण शेतकऱ्याचा शेतात काम करत असताना तोल जावून नाल्यात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. मनोहर विजयसिंग राजपूत अस या शेतकऱ्याचे नाव आहे.
धुळ्यात तरूण शेतकऱ्याचा नाल्यात पडून मृत्यू - shirpur
शिरपूर तालुक्यातील टेंभे येथील तरूण शेतकऱ्याचा शेतात काम करत असताना तोल जावून नाल्यात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली.
मृत मनोहर राजपूत
मनोहर विजयसिंग राजपूत (वय ३० वर्षे, रा. टेंभे, ता. शिरपूर) हे सकाळी स्वतःच्या शेतात काम करण्यासाठी गेले होते. काम करत असताना शेताजवळील नाल्यात तोल जाऊन पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. २ वर्षांपूर्वी मनोहरचे लग्न झाले होते. मनोहर राजपूत यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.