धुळे - बँकेतून घेतलेले पिक कर्ज आणि शेतीसाठी घेण्यात आलेल्या कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून शेतकऱ्याने गुरांच्या गोठ्यातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील भडणे गावात घडली आहे. विजय दिगंबर निकम (वय, ६५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
पिक कर्ज फेडण्याच्या विंवचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या - shindkheda farmer suicide news
विजय दिगंबर निकम यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया व सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून पीककर्ज तसेच शेतीच्या कामासाठी कर्ज घेतले होते. ते कर्ज फेडू न शकल्यामुळे त्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
शिंदखेडा तालुक्यातील भडणे गावातील शेतकरी विजय दिगंबर निकम सततच्या नापिकीमुळे चिंतेत होते. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया व सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून पीककर्ज तसेच शेतीच्या कामासाठी कर्ज घेतले होते. त्याची परतफेड करण्याच्या ते चिंतेत होते. ते फेडू न शकल्यामुळे विजय निकम यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता संचारी विजयचा अपघाती मृत्यू, ब्रेन डेड केले घोषित