महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - भरत पाटील

कर्जबाजारीपणाला तसेच सततची नापिकी, भिषण दुष्काळ याला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

मृत शेतकरी भरत जिभाऊ पाटील

By

Published : Jun 28, 2019, 5:00 PM IST

धुळे- लोणखेडी येथील एका ५२ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या शेतात विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून सततची नापिकी, दुष्काळ आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली आहे. शासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेऊन आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

मृत शेतकरी भरत जिभाऊ पाटील

धुळे तालुक्यातील लोणखेडी येथील भरत जिभाऊ पाटील (वय ५२) यांनी आपल्या शेतात विषारी द्रव्य घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. भरत पाटील हे शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळून आले असता त्यांच्या मुलाने त्यांना गावातील रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भरत पाटील यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज होते. या कर्जबाजारीपणाला तसेच सततची नापिकी, भिषण दुष्काळ याला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. या घटनेमुळे लोणखेडी गावात खळबळ उडाली असून भरत पाटील यांच्या पश्चात पत्नी आणि १ मुलगा असे कुटुंब आहे. शासनाने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे. भरत पाटील यांच्या मृतदेहाचे धुळे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details