महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यातील शिरपूर स्फोटप्रकरणी चौकशी समितीची स्थापना

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील वाघाडीजवळ असलेल्या रुमित कंपनीत रासायनिक प्रक्रिया सुरू असताना स्फोट झाल्याची घटना 31 ऑगस्टला घडली होती. या घटनेत 14 जणांचा होरपळून मृत्यू तर, 70 हून अधिक जण जखमी झाले होते.

शिरपूर स्फोटप्रकरणी चौकशी समितीची स्थापना

By

Published : Sep 17, 2019, 5:11 PM IST

Updated : Sep 17, 2019, 7:03 PM IST

धुळे- जिल्ह्यातील शिरपूर येथील रुमित केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटप्रकरणी राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशीसाठी 7 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. यासंदर्भात काढलेल्या परिपत्रकात मानवनिर्मित घटनेला अपघात दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी अपेक्षा मृतांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

शिरपूर स्फोटप्रकरणी चौकशी समितीची स्थापना

हेही वाचा - धुळे: राजस्थानकडे जाणारा ८० लाख रुपयांचा गुटखा शिरपूर पोलिसांनी केला जप्त

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील वाघाडीजवळ असलेल्या रुमित कंपनीत रासायनिक प्रक्रिया सुरू असताना स्फोट झाल्याची घटना 31 ऑगस्टला घडली होती. या घटनेत 14 जणांचा होरपळून मृत्यू, तर 70 हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेत कारखान्याच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र,आता या घटनेच्या तपासासाठी राज्य सरकारने 7 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे.

या घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने चौकशी समिती स्थापण्याची शिफारस केली होती. या पार्श्वभूमीवर उद्योग, उर्जा, कामगार विभागाने अपघाताची सखोल चौकशी आणि अशा घटनांची भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी या समितीची स्थापना केली आहे. येत्या महिन्याभरात चौकशी समितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असून याप्रकरणी राज्य सरकार काय कारवाई करत हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.

हेही वाचा - धुळे प्रांताधिकारी कार्यालयावर सत्यशोधक शेतकरी सभेचा मोर्चा

  • 7 सदस्य कोण ?

या समितीच्या अध्यक्षपदी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे संचालक सुधाकर राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डी. बी. मोरे, प्रवीण घुले, एस.एम. कुरमुडे, शिवाजी विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभागाचे माजी प्रमुख प्राध्यापक केशरसिंह पाटील, स्पेक्ट्रम कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक विलास पवार, नाशिक येथील राज्य गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त कावेरी कमलाकर यांचा या समितीत समावेश असणार आहे.

Last Updated : Sep 17, 2019, 7:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details