धुळे- डॉ. सुभाष भामरे आणि कुणाल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करताना केलेला खर्च निवडणुकीच्या खर्चात टाकण्यात यावा आणि दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात त्यांच्या शिक्षण संस्थांमधील कर्मचारी सर्रासपणे फिरत आहेत. त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.
डॉ. सुभाष भामरे आणि कुणाल पाटील यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी - आमदार अनिल गोटे - कुणाल पाटील
डॉ. सुभाष भामरे आणि कुणाल पाटील यांनी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा सर्वाधिक खर्च आजवर केला असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.
धुळे लोकसभा मतदार संघासाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ९ एप्रिल शेवटची तारीख होती. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन केले होत. याचा खर्च निवडणूक खर्चात टाकण्यात आला नाही.
उमेदवारासोबत कोणत्याही संस्थेतील कर्मचारी अथवा शिक्षक प्रचारासाठी जाऊ शकत नाही. मात्र, डॉ. सुभाष भामरे आणि कुणाल पाटील या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात शिक्षण संस्थांमधील कर्मचारी फिरताना दिसत आहेत. डॉ. सुभाष भामरे आणि कुणाल पाटील यांनी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा सर्वाधिक खर्च आजवर केला असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. याबाबत आपण निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यावर अद्याप आपल्याला उत्तर मिळालेले नाही, अशी माहिती अनिल गोटे यांनी दिली.