महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यातील नागरिकांना लोकसभा निवडणुकीत पुन्हा मिळणार तिच आश्वासने? - आश्वासन

१६ व्या लोकसभा निवडणुकीवेळी धुळे-मनमाड-इंदौर रेल्वेमार्ग, बेरोजगारी, महिलांच्या समस्या, शिक्षण, मतदार संघाचा औद्योगिक विकास या प्रमुख विषयांवर डॉ. सुभाष भामरे यांनी ही निवडणूक लढवली होती. मात्र, गेल्या ५ वर्षात यापैकी कोणत्याही एका विषयावर पुरेसे काम झालेले नाही. तसेच या मतदार संघातील सिंचनाचा प्रश्नही पूर्णपणे सुटलेला नाही.

डॉ. सुभाष भामरे

By

Published : Mar 12, 2019, 11:44 AM IST

धुळे -लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून धुळे लोकसभा मतदार संघात या निवडणुकीतही भाजप आणि काँग्रेसमधील लढत पाहायला मिळणार आहे. मात्र, या निवडणुकीत मतदारांसमोर जाताना भाजप गेल्या निवडणुकीतीलच मुद्दे आणि प्रश्न घेऊन जाईल, असे चित्र धुळे लोकसभा मतदार संघात पाहायला मिळत आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने खासदार डॉ. सुभाष भामरे यांना आयात करून उमेदवारी दिली होती. एक उच्चशिक्षित उमेदवार म्हणून डॉ. भामरेंची ओळख होती. मोदी लाटेवर स्वार होत डॉ. भामरे धुळे लोकसभा मतदार संघातून विजयी झाले होते. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे अमरीश पटेल यांचा पराभव केला होता.

१६ व्या लोकसभा निवडणुकीवेळी धुळे-मनमाड-इंदौर रेल्वेमार्ग, बेरोजगारी, महिलांच्या समस्या, शिक्षण, मतदार संघाचा औद्योगिक विकास या प्रमुख विषयांवर ही निवडणूक लढवली होती. मात्र, गेल्या ५ वर्षात यापैकी कोणत्याही एका विषयावर पुरेसे काम झालेले नाही. तसेच या मतदार संघातील सिंचनाचा प्रश्नही पूर्णपणे सुटलेला नाही. वास्तविक डॉ. भामरे हे ग्रामीण भागातून आलेले आहेत. मात्र, तरीदेखील ग्रामीण भागातील समस्यांवर त्यांनी आपल्या कार्यकाळात पूर्णपणे काम केलेले नाही.

केवळ आश्वासनांची खैरात

धुळे लोकसभा मतदार संघ हा कांदा आणि डाळिंब या पिकांचे आगार म्हणून ओळखला जातो. मात्र, या पिकांबाबत पुरेशी मदत न मिळाल्याने याठिकाणी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. शेतमालाच्या हमीभावाबाबतही केवळ आश्वासनेच मिळाली. रोजगाराचा मुद्दाही येथील राजकारण्यांनी नेहमीच निवडणुकीसाठी वापरला. मात्र, आजही या ठिकाणच्या तरुणांना रोजगारासाठी गुजरातमध्ये जावे लागते. विशेष म्हणजे याठिकाणी आयआयटी आणि अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था मोठ्या प्रमाणावर असूनही स्थानिक स्तरावर रोजगार तसेच कारखानदारांना कामगार मिळत नाही. यामुळे यंदाची ही निवडणूक पुन्हा एकदा बेरोजगारी, सिंचन, शेतीमालाला हमीभाव, याविषयांवरून लढवली जाईल हे मात्र नक्की.

ABOUT THE AUTHOR

...view details