धुळे -साक्री तालुक्यातील म्हसदी येथे विवाहनिमित्त आलेल्या महिलांना गावातील काही महिला व पुरुषांनी बेदम मारहाण करत काही महिलांवर अतिप्रसंग करण्याचा देखील प्रकार घडला आहे. तसेच महिलांची गावातून धिंडही काढण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामागील नेमेके कारण समजू शकलेले नाही. परंतु, एका पीडितेने विनयभंग करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - धक्कादायक! जीन्स, टी-शर्ट घातली म्हणून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न
म्हसदी येथील मूळ रहिवासी असलेली पीडिता विवाह सोहळ्यानिमित्त म्हसदी येथे आली होती. विवाह सोहळ्याला जाण्याची तयारी करत असताना एका तरुणाला त्यांच्या घरासमोर मारहाण होत असताना त्यांनी पाहिले. हा प्रकार पाहण्यासाठी पीडिता घराबाहेर पडली असता त्यातील एका पुरुषाने त्यांचा विनयभंग करण्याचा देखील प्रयत्न केला.
गावातील गंगामाता कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश आत्माराम देवरे, सी. डी. देवरे, उज्वला सतीश देवरे, मुख्याध्यापिका वर्षा नरेंद्र देवरे, नरेंद्र आत्माराम देवरे यांनी गावातील आदिवासी महिला पुरुषांना हाताशी धरून पीडितेसह त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करत गावातून धिंड काढली. गावातील राजकारणाचा आपल्याशी कोणताही संबंध नसताना आपल्याला मारहाण करून धिंड काढण्याचा किळसवाणा प्रकार झाला असून याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडितेने केली आहे. मारहाण करणाऱ्यांचे गेल्या 6 महिन्यातील फोनचे तपशील तपासावे, अशी मागणीही पीडितेने केली आहे. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमरण उपोषणास बसू असा इशारा पीडितेने दिला आहे.
घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून घटनेमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेचा जिल्हाभरातून विविध महिला संघटनांनी निषेध केला आहे.
हेही वाचा - विवाहित महिलेची राजस्थानात 2 लाखात विक्री; 6 आरोपींना अटक