धुळे -शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरचे कोरोना तपासणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आता आरोग्ययंत्रणा खडबडून जागी झाली आहे. धुळे जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर धुळे आता हळूहळू कोरोनाचे हॉटस्पॉट बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे.
डॉक्टरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; धुळ्यात खळबळ - धुळे कोरोना बातमी
धुळे जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर धुळे आता हळूहळू कोरोनाचे हॉटस्पॉट बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे.
doctor from dhule tested positive
आतापर्यंत कोरोनाची लागण नागरिकांनाच होतांना दिसत होते. परंतु आता कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनादेखील कोरोनाची लागण झाल्याने आता उपचार करणाऱ्या डॉक्टरांमध्येदेखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.