धुळे -विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी विविध जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
धुळे: मतदार जनजागृतीसाठी पार पडल्या जिल्हास्तरीय स्पर्धा हे ही वाचा -महाराष्ट्र बोलतोय... पाच वर्षांनंतरही गडचिरोलीतील बोदली गावातील समस्या कायम
विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी तसेच नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये जिल्हाभरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदानाविषयी माहिती देऊन त्यांना मतदान करण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने यावेळी केले.
हे ही वाचा -महाराष्ट्र बोलतोय : औरंगाबादचे नवमतदार म्हणतायत, 'निवडणूक ही मूलभूत प्रश्नांवर व्हावी'