महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे जिल्हा परिषदेतील लाचखोर कर्मचारी अटकेत

धुळे जिल्हा परिषदेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचे जीपीएफ फंडातील ५० हजार रुपयांच्या रकमेचा परतावा मिळावा म्हणून या कर्मचाऱ्याने धुळे येथील अर्थ विभागात पाठपुरावा केला. यावेळी अर्थ विभागात कार्यरत कनिष्ठ सहाय्यक विलास मधुकर पाटील (३६) यांनी तक्रारदार यांच्याकडे परतावा मंजूर करण्यासाठी १ हजार ५०० रुपये लाचेची मागणी केली. अशी तक्रार संबंधित तक्रारदाराने धुळे लाचलुचपत विभागाकडे केली.

धुळे जिल्हा परिषदेतील लाचखोर कर्मचारी अटकेत

By

Published : Oct 2, 2019, 4:31 AM IST

Updated : Oct 2, 2019, 6:14 AM IST


धुळे - जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्याच्या जीपीएफ फंडातील परतावा मंजूर करून देण्यासाठी १ हजार ५०० रुपये लाचेची मागणी करणाऱ्या अर्थ विभागातील कनिष्ठ सहाय्यक अधिकाऱ्याला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

धुळे जिल्हा परिषदेतील लाचखोर कर्मचारी अटकेत

हे ही वाचा -यवतमाळमध्ये ग्रामसेवकास पन्नास हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

धुळे जिल्हा परिषदेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचे जीपीएफ फंडातील ५० हजार रुपयांच्या रकमेचा परतावा मिळावा म्हणून या कर्मचाऱ्याने धुळे येथील अर्थ विभागात पाठपुरावा केला. यावेळी अर्थ विभागात कार्यरत कनिष्ठ सहाय्यक विलास मधुकर पाटील (३६) यांनी तक्रारदार यांच्याकडे परतावा मंजूर करण्यासाठी १ हजार ५०० रुपये लाचेची मागणी केली. अशी तक्रार संबंधित तक्रारदाराने धुळे लाचलुचपत विभागाकडे केली. लाचलुचपत विभागाने या तक्रारीची दखल घेत शहानिशा केली असता तक्रारीत सत्यता असल्याचे समोर आले. पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद कार्यालय आवारात सापळा रचून विलास पाटील याला तक्रारदार यांच्याकडून १ हजार ५०० रुपयांची लाच घेताना पथकाने रंगेहाथ पकडले. अचानक झालेल्या कारवाईने कार्यालय आवारात एकच खळबळ उडाली. विलास पाटील याला ताब्यात घेत लाचलुचपत विभाग कार्यालयात नेले. याप्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा -एक लाखाची लाच स्वीकारताना पैठणचा तहसीलदार अटकेत

Last Updated : Oct 2, 2019, 6:14 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details