महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना आजाराशी लढण्यासाठी वृद्धाश्रम सज्ज.. - Matoshri Vrudhaashram take precaution for Corona virus

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील मातोश्री वृद्धाश्रम वृद्धांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज झाल असून याठिकाणी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.

Dhule Vrudhaashram
कोरोना आजाराशी लढण्यासाठी वृद्धाश्रम सज्ज..

By

Published : Mar 18, 2020, 4:51 PM IST

धुळे - संपूर्ण देशात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या आजारापासून बचाव करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून विविध उपाययोजना राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत आहेत. त्याच प्रमाणे धुळे शहरातील मातोश्री वृद्धाश्रमात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर विविध उपाय योजना राबविण्यात येऊन वृद्धांची योग्य त्या प्रकारे काळजी घेण्यात येत आहे.

कोरोना आजाराशी लढण्यासाठी वृद्धाश्रम सज्ज..

याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हात स्वच्छ धुऊन प्रवेश दिला जात आहे. तसेच गर्दी टाळण्याचे आवाहन देखील वृद्धाश्रम संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. वेळोवेळी स्वच्छता मोहिमेसह वृद्धांची देखील स्वच्छता राखली जात आहे. वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध वस्तूंचं सेवाभावी संस्थांनी दान करावं, असं आवाहन वृद्धाश्रमाच्या वतीने करण्यात आला आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details