धुळे - दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर जिल्हा पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या हस्ते सपत्नीक शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा सण संपूर्ण धुळे जिल्ह्यात उत्साहात साजरा होत आहे. दसरा सणानिमित्त शहरातील मुख्य बाजारपेठ गर्दीने गजबजून गेली आहेत. कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून मंदावलेली बाजारपेठ दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर फुलून गेली आहे. अनेक महिन्यानंतर बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल झाली.