महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यात पोलिसांकडून साडे सात लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त

देशी विदेशी दारूची चोरटी विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला. या ठिकाणाहून तब्बल ७ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

dhule police
धुळ्यात पोलिसांनी जप्त केला लाखो रुपयांचा मद्यसाठा

By

Published : Apr 6, 2020, 9:31 AM IST

धुळे- तालुक्यातील आंबागाव शिवारात अमरीश नगर येथे प्रवीण पावरा हा देशी विदेशी दारूची चोरटी विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला. या ठिकाणाहून तब्बल ७ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे दारूची चोरटी विक्री करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

धुळे तालुक्यातील आंबागाव शिवारात धुळे शहरातून स्विफ्ट डिझायर कार अमरीशनगर येथे देशी-विदेशी दारू घेण्यासाठी गेली असल्याची माहिती स्थानिक गुन्हॆ अन्वेषण विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक आंबा गावाच्या शिवारात रोडवर दबा धरून बसले होते. याठिकाणी आलेल्या एका गाडीची तपासणी करण्यात आली. या गाडीत ७३ हजार ६७० रुपये किमतीची विदेशी दारू आढळली. ही दारू कुठून आणली, याबाबतची चौकशी करून तिथे जाऊनही पथकाने कारवाई केली. आंबा गाव शिवारातील अमरीश नगर याठिकाणी जाऊन पथकाने पाहणी केली असता याठिकाणी प्रवीण पावरा आणि जयपाल राजपूत ( दोन्ही राहणार पळासनेर, ता शिरपूर) हे दोघे जण दारूविक्रीचा व्यवसाय करताना आढळले. पोलिसांना पाहून प्रवीण पावरा आणि दीपक धोबी हे पसार झाले. मात्र, जयपाल राजपूत हा पोलिसांच्या हाती लागला आहे. याठिकाणाहून पथकाने मुद्देमाल आणि वाहन असा एकूण ७ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details