महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यात कंटेनरसह 29 लाख रुपयांचा बेकायदेशीर गुटखा जप्त - dhule police

धुळे शहरात चाळीसगावकडून एका कंटेनरमध्ये बेकायदेशीर गुटखा आढळून आला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वरील शिरूड चौफुली जवळ नाकाबंदी करून रात्री एक वाजताच्या सुमारास पोलिसांनी कंटेनरमधील गुटखा जप्त केला.

dhule-police-seized-illegal-gutka
धुळ्यात कंटेनरसह 29 लाख रुपयांचा बेकायदेशीर गुटखा जप्त

By

Published : Dec 25, 2019, 1:16 PM IST

धुळे - शहराजवळील शिरूड चौफुली जवळ तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने रात्री एक वाजता कंटेनरमधून सुमारे 28 लाख 95 हजार रुपये किमतीचा बेकायदेशीर गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी कंटेनरच्या चालकाला अटक करण्यात आले आहे.

धुळ्यात कंटेनरसह 29 लाख रुपयांचा बेकायदेशीर गुटखा जप्त

हेही वाचा - विकी लाखे खून प्रकरण: संशयितांना पकडणार्‍या टीमचे अप्पर पोलीस अधीक्षकांकडून कौतुक

धुळे शहरात चाळीसगावकडून एका कंटेनरमध्ये बेकायदेशीर गुटखा असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वरील शिरूड चौफुली जवळ नाकाबंदी करून रात्री एक वाजताच्या सुमारास केए 01 एएफ 2392 क्रमांकाच्या आयसर कंटेनरची तपासणी केली. यात पोलिसांना 16 लाख 47 हजार रुपये किमतीचा सागर पान मसाला गुटखा मिळाला आहे. ज्यात एकूण 61 पांढऱ्या रंगाचे प्लॅस्टिकचे पोते, 48 हजार रुपये किमतीचा सागर पान मसाला नावाच्या कापडी बॅग यांची एकूण सहा पोते, असा मुद्देमाल आढळून आला.

बारा लाख रुपये किमतीचा आयसर कंटेनर असा एकूण 28 लाख 95 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी चालक अब्दुल्लाह अबु कलाम (वय 21 वर्षे, उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेण्यात आल आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेला गुटखा महाराष्ट्र राज्यात बंदी घातला गेलेला असून हा मुद्देमाल हैदराबाद येथून अहमदाबाद (गुजरात) येथे घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. धुळे जिल्ह्यातून वारंवार बेकायदेशीर गुटख्याची वाहतूक होत असल्याच्या घटना समोर येत असताना या घटना गांभीर्याने घेऊन वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचे नागरिक म्हणत आहेत.


हेही वाचा - धक्कादायक! पुण्यातील महिलांना पाठवले अश्लील मेसेज; 80 वर्षीय पुजाऱ्याला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details