धुळे -गोवा येथून गुजरातकडे जाणारा अवैध मद्यसाठा धुळे शहरातील आझादनगर पोलिसांच्या पथकाने जप्त केला असून, या कारवाईत पथकाने तब्बल 13 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. आझादनगर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने महामार्गावरील पारोळा चौफुली येथे ही कारवाई केली.
धुळे पोलिसांची मोठी कारवाई, गाडीसह 13 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
गोवा येथून गुजरातकडे जाणारा अवैध मद्यसाठा धुळे पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गाडीसह 13 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून, दोघांना अटक केली आहे.
धुळे शहरातील आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना पणजीमधून धुळेमार्गे गुजरातला देशी, विदेशी दारूचा साठा जाणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. पोेलिसांकडून या मार्गावरील गाड्यांची तपासणी करण्यात येत होती. त्याचवेळी मुंबई आग्रा महामार्गवरील पारोळा चौफुलीच्या उड्डाणपुलावरून एक संशयित आयशर गाडी येतांना पोलिसांना दिसली. पोलिसांनी या गाडीची तपासणी केली असता यामध्ये मोठ्याप्रमाणात मद्यसाठा आढळून आला. पोलिसांनी याप्रकरणी गाडीच्या चालकासह आणखी एकाला अटक केली आहे.