धुळे- झोपडीत सुरू असलेल्या बनावट दारुच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकून 3 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिरपूर येथील तालुका पोलिसांनी ही कारवाई केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना प्राप्त झालेल्या माहिती आधारे त्यांचे पथक शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान गावी जाऊन एका झोपडी जवळ पोलीस दाखल झाले. पोलीस आल्याची चाहूल लागल्याने याठिकाणी असलेला धनराज रेशम्या पावरा हा फरार झाला.
शिरपूर पोलिसांनी उद्ध्वस्त केला बनावट दारू कारखाना - shirpur police action
शिरपूर पोलिसांनी बनावट दारुच्या कारखान्यावर छापा टाकून 3 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी बनावट दारु बनवण्यासाठी लागणारे साहित्यही ताब्यात घेण्यात आले.
यावेळी पोलिसांनी झोपडीत तपासणी केली असता झोपडीच्या आत बनावट दारु बनवण्यासाठी लागणारे साहित्य मिळुन आले. यात 2 लाख 70 हजार रुपये किमतीचे स्पिरीटचे 200 मिलीचे 9 ड्रम मिळुन आले. बॉटलला बूच लावण्याचे 1 मशीन, 800 रुपयांचा रिकामा कॅन, ब्रँडचे नाव लिहिलेले 500 रुपयांचे बूच, 3 पोत्यात भरलेले काचेच्या दोन हजार रुपये किमतीच्या बाटल्या, आणि पॅकिंगसाठी लागणारे साहित्य असा एकूण 2 लाख 97 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबत शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.