धुळे - सध्या शहराला ७ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलावात १९.४३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा जुलै अखेरपर्यंत पुरेल अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
धुळे : नकाणे तलावात १९.४३ टक्के जलसाठा, शहराला ७ दिवसाआड होतोय पाणीपुरवठा
धुळे शहरासह परिसरात यंदा भीषण दुष्काळामुळे नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. धुळे शहराला नकाणे तलावातून पाणी पुरवठा केला जातो. नकाणे तलावात अक्कलपाडा आणि हरणमाळ तलावातून पाणी सोडून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
धुळे शहरासह परिसरात यंदा भीषण दुष्काळामुळे नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. धुळे शहराला नकाणे तलावातून पाणी पुरवठा केला जातो. गेल्यावर्षी झालेल्या पावसामुळे अक्कलपाडा धरण बऱ्यापैकी भरले आहे. धरणातील पाणी नकाणे तलावात सोडून शहराचा पाणी पुरवठा हा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
धुळे शहरासोबत साक्री, दोंडाईचा, शिंदखेडा आणि धुळे ग्रामीण याठिकाणी देखील नागरिकांना ४ ते ५ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. नकाणे तलावात अक्कलपाडा आणि हरणमाळ तलावातून पाणी सोडून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.