धुळे - दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्प सुरू करण्याच्या मागणीसाठी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर समितीच्या वतीने जिल्ह्यात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्प सुरू करण्याच्या मागणीसाठी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर समितीच्या वतीने जिल्ह्यात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा विकासापासून दूर आहे. या जिल्ह्यात बेरोजगार तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे जिल्ह्यात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्प सुरू झाल्यास स्थानिक तरुणांच्या हाताला रोजगार मिळून, बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. तसेच औद्योगिक दृष्ट्या जिल्हा प्रगतीपथावर येण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा : गोंदियातील अधिपरिचारिकांचे कामबंद आंदोलन; केटीएस, बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील सेवा ठप्प
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लवकरात लवकर प्रकल्प सुरू करण्याची मागणी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी संघटनेने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला स्थानिक नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आंदोलनकर्त्यांनी केले आहे.