महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे : दोंडाईचा येथे शिवसेनेकडून नारायण राणेंच्या पुतळ्याचे दहन - Dondaicha Shiv Sena opposes Narayan Rane

मुख्यमंत्री हे घटनात्मकपद असून ते महाराष्ट्र राज्यातील सर्व जनतेचे प्रतिनिधित्व करते. तसेच, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अत्यंत सक्षमपणे महाराष्ट्र राज्याला संकटातून बाहेर काढणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख केल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत, असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.

शिवसेनेकडून नारायण राणेंच्या पुतळ्याचे दहन
शिवसेनेकडून नारायण राणेंच्या पुतळ्याचे दहन

By

Published : Oct 27, 2020, 7:35 PM IST

धुळे -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्याच्या निषेधार्थ नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे शिवसेनेच्या वतीने दहन करण्यात आले. नारायण राणेंवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली.

माहिती देताना शिवसेना पदाधिकारी

मुख्यमंत्री हे घटनात्मक पद असून ते महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेचे प्रतिनिधित्व करते. तसेच, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अत्यंत सक्षमपणे महाराष्ट्र राज्याला संकटातून बाहेर काढणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख केल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहे. सर्व शिवसैनिक तसेच जनतेचा अपमान झाला आहे. त्यामुळे, नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. राणे यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी दोंडाईचा शिवसेना तर्फे करण्यात आली आहे.

हेही वाचा-स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी, नरडाना एमआयडीसीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details