धुळे - शहरातील मर्चंट बँकेत गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे व्यवस्थापकीय कार्यालयास सील करण्यात आले आहे. याप्रकरणी बँकेचे उपनिबंधक ठाकूर यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी हि कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे देण्यात आला असून ठाकूर याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
गैरव्यवहार प्रकरणी मर्चंट बँकेचे व्यवस्थापकीय कार्यालय सील - धुळे बातमी
बँकेच्या व्यवस्थापकीय कार्यालयाची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने बुधवारी दुपारी झाडाझडती घेऊन सील केले. यावेळी महत्वाची कागदपत्रे असलेले कपाट सील करण्यात आले. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

धुळे शहरातील मर्चंट बँकेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार एका सभासदाने केली होती. त्या तक्रारीनुसार बँकेच्या उपनिबंधक ठाकूर यांची चौकशी करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बँकेच्या व्यवस्थापकीय कार्यालयाची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने बुधवारी दुपारी झाडाझडती घेऊन सील केले. यावेळी महत्वाची कागदपत्रे असलेले कपाट सील करण्यात आले. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. व्यवस्थापक उपनिबंधक ठाकूर यांनी लाभापोटी सभासद हिताचे नुकसान केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणात आणखी काही व्यक्तींचा समावेश असून त्यांची देखील चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईमुळे धुळे शहरातील खळबळ उडाली आहे.