धुळे - सांगली आणि कोल्हापूर येथील पुरग्रस्तांना धुळे शहरातील मराठा उद्योग लॉबीच्या वतीने विविध जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या. तसेच अजुनही नागरिकांनी मदत करावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे यांनी केले.
धुळ्यातील मराठा उद्योग लॉबीने पुरग्रस्तांसाठी पाठवली मदत - kolhapur sangali flood victims
सांगली आणि कोल्हापूर येथील पुरग्रस्तांना धुळे शहरातील मराठा उद्योग लॉबीच्या वतीने विविध जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या. तसेच अजुनही नागरिकांनी मदत करावी असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे यांनी केले.
सांगली आणि कोल्हापूर येथे आलेल्या महापुरामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना मदतीची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाली आहे. सांगली आणि कोल्हापूर येथील नागरिकांना संपूर्ण राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. पुरग्रस्त भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर गरज असून धुळे शहरातील मराठा उद्योग लॉबीच्या वतीने जीवनावश्यक वस्तूसह अन्न धान्य तसेच कपडे पाठवण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे यांच्यासह मराठा उद्योग लॉबीचे पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे यांनी केले आहे.