महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यातून भाजपचे डॉ. सुभाष भामरे विजयी - dhananjay dixit

धुळे लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल लागले असून जपचे डॉ. सुभाष भामरे विजयी

संपादीत छायाचित्र

By

Published : May 23, 2019, 6:18 AM IST

Updated : May 23, 2019, 7:37 PM IST

- 2.00 - भाजपचे डॉ. सुभाष भामरे १ लाख ४६ हजार मतांनी आघाडीवर

- 12.39 - भाजपचे डॉ. सुभाष भामरे १ लाख १७ हजार ५९२ मतांनी आघाडीवर

- 12.30 - भाजपचे डॉ. सुभाष भामरे १ लाख ५ हजार ८३३ मतांनी आघाडीवर

- 11.50 - सहाव्या फेरी अखेरीस भाजपच्या डॉ. सुभाष भामरे यांना ९५ हजार ९२७ मतांनी आघाडीवर

- 11.35 - भाजपचे डॉ. सुभाष भामरे ७८ हजार ३८६ मतांनी आघाडीवर

-11.00 - भाजपचे डॉ. सुभाष भामरे ५४ हजार मतांनी आघाडीवर

- 10 - 40 - तिसऱ्या फेरी अखेर भाजपचे डॉ. सुभाष भामरे ४१ हजार ६८७ मतांनी आघाडीवर

- 9.45 - दुसऱ्या फेरी अखेर भाजपचे डॉ. सुभाष भामरे २० हजार १५६ मतांनी आघाडीवर

- 9.00 - भाजपचे डॉ. सुभाष भामरे आघाडीवर

- 8.00 - मतमोजणी सुरूवात

-7.15 - मतमोजणी केंद्रावर कर्मचारी, उमेदवारांचे प्रतिनिधी आणि माध्यम प्रतिनिधी दाखल, चोख बदोबस्त करण्यात आला आहे.

धुळे- खान्देशातील महत्वाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुळे लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. ही मतमोजणी धुळ्यातील गर्व्हमेंट फूड ग्रेड गोडाऊन या ठिकाणी होत आहे. सुरक्षेच्यादृष्टीने या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे तर काँग्रेसकडून कुणाल पाटील रिंगणात आहेत. मात्र, भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल गोटे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. आता या तिहेरी लढतीत कोण बाजी मारणार याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. २०१४ साली ५८.६८ टक्के मतदान झाले होते. तर यावेळी ५६.६८ टक्के इतके मतदान झाले आहे.


२०१४ ची पार्श्वभूमी-
१९९६ ते २०१४ पर्यंत असे सलग १८ वर्षे धुळे लोकसभा मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. २०१४ ला शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेल्या डॉ. सुभाष भामरेंनी शिरपूरच्या अमरीश पटेलांचा पराभव केला होता. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत डॉ. सुभाष भामरे यांना ५ लाख २९ हजार ४५० मते मिळाली होती. सलग १८ वर्ष भाजपचे उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. भाजपचा विजयी रथ असाच दौडणार की आमदार अनिल गोटेंच्या बंडखोरीचा फटका बसणार याचे चित्र काही तासातच स्पष्ट होणार आहे

Last Updated : May 23, 2019, 7:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details