धुळे- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळ धुळ्यातून फोडणार आहेत. येत्या १ मार्चला राहुल गांधींची सभा धुळ्यात पार पडणार आहे. राहुल गांधींच्या या सभेने धुळे लोकसभा मतदार संघातील वातावरणात बदल होतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राहुल गांधींच्या दौऱ्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
लोकसभेचे पडघम : धुळ्यात नारळ फोडून राहुल गांधी करणार महाराष्ट्रातील प्रचाराचा शुभारंभ - bjp
धुळ्यात नारळ फोडून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी करणार महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ... १ मार्चला धुळे मतदार संघात राहुल गांधींची प्रचार सभा पार पडणार...काँग्रेसकडून रोहिदास पाटील यांच्या उमेदवारीवर झालाय शिक्का मोर्तब...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. धुळे लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे रोहिदास पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. धुळे लोकसभा मतदार संघातून काँग्रेसने महाराष्ट्रातील पहिला प्रचार नारळ फोडण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर धुळे शहरात १ मार्च काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेतून काँग्रेस आपले शक्तिप्रदर्शन करणार आहे.
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने धुळे लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरेंना पसंती दिली होती. येत्या निवडणुकीत धुळे लोकसभा मतदार संघात भामरे विरुद्ध पाटील असा सामना पाहायला मिळणार आहे. यापार्श्वभूमीवर धुळे लोकसभा मतदार संघातून पहिली प्रचार सभा घेऊन काँग्रेस शक्तिप्रदर्शन करणार आहे. या सभेमुळे धुळे लोकसभा मतदार संघात मतदार काँग्रेसला कौल देतात का? हे येणारा काळात पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.