महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे: दोंडाईचा घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुखांना अटक - दोंडाई घरकुल घोटाळा

जळगाव घरकुल घोटाळ्यानंतर दोंडाईचा घरकुल प्रकरणात माजी कामगार राज्यमंत्री डॉ हेमंत देशमुख यांना जिल्हा न्यायालयात पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा न्यायालयाने डॉ. देशमुख यांना तात्पुरता जामीन दिला होता. तो रद्द करण्यासाठी जिल्हा न्यायालयात कामकाज सुरू होते. त्यावर न्यायाधीश उगले यांनी दोन्ही पक्षाचे युक्तिवाद ऐकल्यानंतर माजी मंत्री डॉ देशमुख यांना दिलेला तात्पुरता जामीन रद्द केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

धुळे: दोंडाईचा घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुखांना अटक

By

Published : Jul 22, 2019, 9:26 PM IST

Updated : Jul 22, 2019, 10:08 PM IST

धूळे - जळगाव घरकुल घोटाळ्यानंतर दोंडाईचा घरकुल प्रकरणात माजी कामगार राज्यमंत्री डॉ हेमंत देशमुख यांना जिल्हा न्यायालयात पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा न्यायालयाने डॉ. देशमुख यांना तात्पुरता जामीन दिला होता. तो रद्द करण्यासाठी जिल्हा न्यायालयात कामकाज सुरू होते. त्यावर न्यायाधीश उगले यांनी दोन्ही पक्षाचे युक्तिवाद ऐकल्यानंतर माजी मंत्री डॉ देशमुख यांना दिलेला तात्पुरता जामीन रद्द केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

धुळे: दोंडाईचा घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुखांना अटक

दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी दलित,आदिवासी, मातंग समाज मंडळाचे अध्यक्ष कृष्णा नगराळे यांनी औरंगाबाद खंडपीठात केलेल्या याचिकेनुसार, माजी मंत्री हेमंत देशमुख, तत्कालीन माजी नगराध्यक्ष डॉ रवींद्र देशमुख, विक्रम पाटील, गुलाबसिंग सोनवणे, तत्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ, अमोल बागुल, राजेंद्र शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास झाल्यानंतर माजी नगरसेवक गिरीधारी रामराख्या यांच्या खात्यात योजनेच्या ठेकेदाराने जवळपास 15 कोटींचा व्यवहार केला होता. घरकुल योजना राबविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या हाय पॉवर कमिटीचे ते सदस्य होते. त्यामुळे त्यांनाही आरोपी करून जानेवारी महिन्यात अटक करण्यात आली. तेव्हापासून त्यांना कोर्टाने अद्याप जामीन दिलेला नाही. याशिवाय योजनेचे ठेकेदार संतोष जयस्वाल, शिक्षण मंडळाचे माजी सभापती नाजीम शेख अशा एकूण 10 जणांना आरोपी करण्यात आले आहे. गिरीधारी रामराख्या यांच्यानंतर माजी मंत्री हेमंत देशमुख यांना अटक झाली असून 3 नगराध्यक्ष, 3 मुख्याधिकारी, ठेकेदार आणि नाजीम शेख हे तात्पुरत्या जामीनावर आहेत.

दोंडाई शहरात 77 कोटींची घरकुल योजना राबवून देखील त्याचे नित्कृष्ट दर्जाचे काम करणे, एवढा शासनाचा पैसा खर्च करून योजनेतील निधीच्या पैशाने बांधकाम झालेली शाळा स्वतःच्या ज्ञानोपासक शिक्षण संस्थेच्या शाळेला विनामूल्य देणे, योजनेच्या निधीतून बांधण्यात आलेला कत्तलखाना आपल्या हस्तकाच्या कंपनीला नाममात्र भाड्याने देणे, याशिवाय घरकुल योजना राबविताना ती खाजगी जागेवर राबविणे असे विविध आरोप माजी मंत्री डॉ हेमंत देशमुख यांच्यावर आहेत.

याप्रकरणी, शासनातर्फे जिल्हा सरकारी वकील देवेंद्र तंवर आरोपी हेमंत देशमुख यांच्याकडून अभयकुमार ओस्तवाल, सोनवणे तर, तक्रादार कृष्णा नगराळे याच्याकडून अँड नितीन दुसाने यांनी काम पाहिले.

खान्देशात 2 मोठे घरकुल घोटाळे झाले होते. जळगाव घरकुल घोटाळ्यात सुरेश दादा जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना तुरुंगात जावे लागले होते. तर, आता दोंडाईचा घरकुल घोटाळ्यात माजी मंत्री डॉ हेमंत देशमुख यांना तुरुंगात जावे लागले आहे.

Last Updated : Jul 22, 2019, 10:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details