धुळे -शहरातील पांझरा नदीवरील पुराचे पाणी ओसरले आहे. धुळ्यातील पूरस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र, शहरातील चारही पुलांवरील वाहतूक अजूनही बंद ठेवण्यात आली आहे. या पुरात पुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लवकरात लवकर पुलाची दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
धुळ्यातील पूरस्थिती नियंत्रणात; मात्र, चारही पूल वाहतुकीसाठी बंद - dhule flood situation news
गेल्या काही दिवसामध्ये धुळे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पांझरा नदीला पूर आला होता. मात्र, आता धुळ्यातील पूरस्थिती नियंत्रणात आली आहे. यामध्ये पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शहरातील चारही पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसामध्ये धुळे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे धरणातील पाण्याचा पांझरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परिणामी पांझरा नदीला पूर आला होता. या पुरामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने मुख्य मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, मंगळवारी पाणी ओसरल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
पुरामुळे पुलाचे कठडे पूर्णपणे तुटले आहेत. रस्तादेखील खचला आहे. रस्ता आणि पुलाचे काम त्वरीत करावे. तसेच हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात यावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.