धुळे -अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीला कंटाळून शेतकऱ्याने शनिवारी (26 आक्टोबर) विष घेतले. मात्र, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारीउपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा - तामिळनाडू : बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, मृतदेह हाती
धुळे तालुक्यातील खंडलाय येथील प्रवीण उर्फ राजेंद्र भालचंद्र भदाणे (वय 38), असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. अतिवृष्टीमूळे संपूर्ण पिकांचे झालेले नुकसान पाहून त्यांनी विष घेतले. औषध पिऊन घरी आल्यानंतर त्यांना चक्कर येऊ लागली. तसे त्यांनी घरी सांगितल्यानंतर घरातील नातेवाईकांनी धुळ्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
राजेंद्र भदाणे यांच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. प्रवीण भालचंद्र पाटील यांच्या वडिलांच्या नावावर शेती असून ती शेती स्वतः करीत होते. त्यांच्यावर 4 लाख 3 हजार रुपयांचे कर्ज आहे. ठिबक सिंचन व बि-बियाण्यांसाठी पंजाब नॅशनल बँक धुळे येथून कर्ज घेतलेले आहे. अतिवृष्टीमुळे शेतात कपाशी, बाजरी, भुईमूग यांची लागवड केली होती. मात्र, पावसाच्या कहरामुळे पूर्ण पिकांचे नुकसान झाले असून कर्ज कसे फेडावे या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली.
दोन दिवसांपासून शेतीची अवस्था पाहून भदाणे हे दररोज बडबडत असल्याचे गावातील नागरिकांनी सांगितले. राजेंद्र भदाणे यांच्या पश्चात वडील, पत्नी, 12 वर्षाची मुलगी, 10 वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.
हेही वाचा - इंदूरमध्ये भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर