महाराष्ट्र

maharashtra

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी धुळे जिल्हा प्रशासन सज्ज

By

Published : Oct 24, 2019, 3:14 AM IST

सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वांचेच लक्ष लागले आहे ते आज जाहीर होणाऱ्या निकालाकडे. धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात 60 टक्के मतदान झाले आहे. तर धुळे शहर विधानसभा मतदारसंघात 49 टक्के मतदान झाले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी धुळे जिल्हा प्रशासन सज्ज

धुळे- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. या मतमोजणीसाठी धुळे जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वांचेच लक्ष लागले आहे ते आज जाहीर होणाऱ्या निकालाकडे.

धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात 60 टक्के मतदान झाले आहे. तर धुळे शहर विधानसभा मतदारसंघात 49 टक्के मतदान झाले आहे. शहरातील शासकीय धान्य गोदामात धुळे शहर विधानसभा मतदारसंघ आणि धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघाची मतमोजणी केली जाणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी धुळे जिल्हा प्रशासन सज्ज

मतमोजणी केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. एकूण 14 टेबलांवर 14 फेऱ्या मतमोजणीच्या होणार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details