धुळे - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊनची मुदत ३१ मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. धुळे जिल्ह्यात कोरोना प्रसाराचा वेग मंदावला होता. मात्र रविवारी धुळे शहरात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. शिरपूर तालुक्यातही दोन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६९ झाली आहे. जिल्हा प्रशासनासाठी ही एक चिंतेची बाब आहे.
Coronavirus : धुळे जिल्ह्यात आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर, एकूण आकडा ६९वर - धुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
धुळे जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळून आले. धुळे शहरात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. शिरपूर तालुक्यातही दोन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे धुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६९ झाली आहे. जिल्हा प्रशासनासाठी ही एक चिंतेची बाब आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ६६वर थांबला होता. धुळे जिल्ह्यातील नागरिक हळूहळू कोरोना संकटातून सावरत असतानाच जिल्ह्यात पुन्हा तीन नवे कोरोना रुग्ण वाढल्याने प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे.
धुळे शहरातील वाडीभोकर रोड, देवपूर परिसरातील ३५ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. तसेच शिरपूर तालुक्यातील अर्थे येथील एसआरपी जवानाचे आई आणि वडील या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी घरातच बसावे व प्रशासनाला सहकार्य करावे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.