महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे जिल्ह्याचा बारावी निकाल ९१.११ टक्के; नाशिक विभागात मारली बाजी

नाशिक विभागातून यंदा धुळे जिल्ह्याची बारावी निकालातील टक्केवारी ५ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Jul 16, 2020, 3:23 PM IST

Updated : Jul 16, 2020, 3:42 PM IST

धुळे- दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बारावीच्या परीक्षेत मुलांच्या तुलनेत बाजी मारत घवघवीत यश संपादन केले. धुळे जिल्ह्याचा बारावी परीक्षेचा निकाल ९१.११ टक्के लागला आहे. नाशिक विभागात विद्यार्थी उत्तीर्ण होण्यात धुळे जिल्ह्याने बाजी मारली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये बारावीची परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर करण्यात आला.

धुळे जिल्ह्यातून बारावी परीक्षेसाठी २३ हजार ९७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी २१ हजार ८४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक विभागात उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलींची टक्केवारी ९२.५४ टक्के आहे. तर मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८६.०९ टक्के आहे.

धुळे जिल्ह्याची बारावी निकालातील टक्केवारी वाढली!

धुळे जिल्ह्यातून मुली ९४.०६ टक्के तर मुलेनाशिक विभागातून यंदा धुळे जिल्ह्याची बारावी निकालातील टक्केवारी ५ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे. ८९.०४ टक्के उत्तीर्ण झाले आहेत. या निकालात नाशिक विभागातून धुळे जिल्ह्याची बारावी निकालातील टक्केवारी ५ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे. तर धुळेपाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनीदेखील घवघवीत यश संपादन केले आहे. कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल घरीच पाहावा लागला आहे.

Last Updated : Jul 16, 2020, 3:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details