धुळे -जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मुदत संपल्यानंतर ही मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षांच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, सहा महिने उलटून देखील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा तिढा सुटत नसल्याने अखेर राज्य सरकारकडून धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती बरखास्त करण्यात आली आहे.
धुळे जिल्हा परिषद राज्य सरकारकडून बरखास्त, प्रशासकाची नेमणूक - Dhule district council
धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मुदत संपून सहा महिन्याहून अधिक काळ लोटून देखील अद्यापही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा तिढा सुटत नाहि आहे. अखेर राज्य सरकारच्या वतीने धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मुदत संपून सहा महिन्याहून अधिक काळ लोटून देखील अद्यापही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा तिढा सुटत नाही. अखेर राज्य सरकारच्यावतीने धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांच्या बाबत हरकत घेण्यात आली होती. याबाबत तात्काळ निर्णय घेऊन निवडणुका जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, अद्यापही हा निर्णय न झाल्याने अखेर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती बरखास्त करण्यात आली आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती व प्रशासकाची नेमणूक करण्यात येणार असून निवडणूका होईपर्यत प्रशासक कायम असणार आहे.