धुळ्यात आणखी 21 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह.. कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडली शंभरी..! - धुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
धुळे जिल्ह्यात आणखी 21 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने शतकी मजल मारली आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून लोकांमध्ये चिंता वाढली आहे.
धुळे - जिल्ह्यात कोरोनाने शतकाचा आकडा पूर्ण केला आहे. रात्री आलेल्या अहवालात 21जण पॉझिटिव्ह असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे.
धुळे जिल्ह्यात या आधी एकूण 81 जँणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आता यामध्ये भर पडत एकूण 21 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. यात शुक्रवारी दुपारी शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाने शतक पूर्ण करत 102वर आकडा पोहोचला आहे. यामुळे धुळे जिल्ह्याची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 48 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.