धुळे - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील आलेल्या अहवालानुसार शिरपूर येथील एका 58 वर्षीय पुरुषाचा तर शिंदखेडा तालुक्यातील वसमाने येथील एका 27 वर्षीय तरुणाचा कोरोना मुळे मृत्यू झाला असल्याचं समोर आला आहे. धुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 31 झाली असून आत्तापर्यंत 166 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
धुळे: 2 कोरोनाबधितांचा मृत्यू , मृतांचा आकडा 31 वर - धुळे: 2 कोरोनाबधितांचा मृत्यू
धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील आलेल्या अहवालानुसार शिरपूर येथील एका 58 वर्षीय पुरुषाचा तर शिंदखेडा तालुक्यातील वसमाने येथील एका 27 वर्षीय तरुणाचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झाला आहे.

धुळे: 2 कोरोनाबधितांचा मृत्यू
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये धुळे शहरातील 14 जणांचा तर ग्रामीण भागातील 16 जणांचा मृत्यूचा समावेश झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्हा मृत्यू दराच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असून जिल्ह्यात वाढती कोरोनाबधितांची संख्या आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवणारी आहे. शहरात सध्या 89 कंटेन्मेंट झोन असून शुक्रवारी झालेल्या 2 जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.