महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे महापालिकेत आता होणार ऑनलाइन 'कर'भरणा - भरणा

धुळे महानगरपालिकेत नागरिकांच्या सोयीसाठी आता लवकरच ऑनलाइन 'कर' भरणा सुरू होणार आहे. यामुळे आता नागरिकांना कर भरण्यासाठी महापालिकेत येण्याची गरज भासणार नाही.

धुळे महापालिका

By

Published : May 2, 2019, 2:17 PM IST

धुळे- महानगरपालिकेत नागरिकांच्या सोयीसाठी आता लवकरच ऑनलाइन 'कर' भरणा सुरू होणार आहे. यामुळे आता नागरिकांना कर भरण्यासाठी महापालिकेत येण्याची गरज भासणार नाही. या सुविधेचा फायदा बाहेरगावी राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

धुळे महापालिका


धुळे महापालिकेत मालमत्ता कर भरणा करण्यासाठी बँक खिडकीची सुविधा मनपा प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेच्या कर विभागाचे संगणकीकरण करण्यात आले आहे. त्यात कोणाच्या नावावर किती कर आहे, थकबाकी किती आहे यासह पत्ता देखील मिळणार आहे. नागरिकांना संगणकीकृत पावती दिल्यावर बँकेत थेट कर भरणा करता येणार आहे.


ऑनलाइन कर भरणा सुविधेमुळे कर भरणा करणे अधिक सोपे होणार असून नागरिकांना महापालिकेत येण्याची गरज राहणार नाही. यामुळे वेळ आणि पैसे वाचणार आहेत. कर भरणा केल्यानंतर त्याची खात्यावर नोंद होणार आहे. यामुळे या सुविधेचा फायदा बाहेरगावी राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details