धुळे - पुण्यातील आरोग्यसेवा संचालनालयाने संकलित केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार कोरोनामुक्त आणि रुग्ण वाढीचे प्रमाण दुप्पट असलेल्यांच्या यादीत धुळे जिल्हा पहिल्या स्थानावर आहे. 35 जिल्ह्यांच्या यादीत धुळे प्रथम ठिकाणी तर मुंबई आणि ठाणे अनुक्रमे दुसरा आणि तिसऱ्या ठिकाणी आहे.
कोरोनामुक्त होणाऱ्या जिल्ह्याच्या यादीत धुळे जिल्हा प्रथम क्रमांकावर - धुळे ताज्या बातम्या
कोरोनामुक्त आणि रुग्ण वाढीचे प्रमाण दुप्पट असलेल्यांच्या यादीत धुळे जिल्हा पहिल्या स्थानावर असून 20 सप्टेंबररोजी संकलित केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 84.22 टक्के एवढे आहे. तर डब्लिंग रेट हा 69.89 टक्के एवढा आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयाने 10 ते 20 सप्टेंबर या दहा दिवसांच्या कालावधीत मुंबई महानगरासह प्रत्येक जिल्ह्याची माहिती संकलित केली. या माहितीनुसार धुळे जिल्हा कोरोनामुक्त आणि डब्लिंग रेटमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला मागे टाकत जिल्ह्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचं समोर आले आहे. 20 सप्टेंबरच्या संकलित केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 84.22 टक्के एवढे आहे. वैद्यकीय भाषेत डब्लिंग रेट म्हणजे रुग्णांचे प्रमाण दुप्पट होणासाठी लागणाऱ्या कालावधीत देखील धुळे जिल्हा पुढे आहे. आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार डब्लिंग रेट वाढल्यास कोरोनावर मात करणे सहज शक्य होणार आहे. सध्याचा धुळे जिल्ह्याचा डब्लिंग रेट हा 69.89 टक्के एवढा आहे. धुळेकरांसाठी ही बाब अत्यंत दिलासादायक असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.