धुळे - जिल्ह्यातील शिरपूर येथे प्रांताधिकारी विक्रम बादल यांना मारहाण झाल्याच्या घटनेनंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी वाळू माफियांविरुद्ध कठोर पाऊले उचलली आहेत.
वाळू माफियाचा सिनेस्टाईल पाठलाग करत अडवला ट्रक! जिल्हाधिकाऱ्यांची धाडसी कामगिरी - dhule
जिल्हाधिकाऱ्यांच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील वाळूमाफियांचे धाबे दणाणले असून अश्या कारवाया यापुढेही चालू राहतील अशी आशा सर्व सामान्य जनतेला वाटू लागली आहे.
शिरपूरमध्ये वाळूमाफियांनी अवैध वाळू वाहून नेण्याचे काम सर्रास चालू होते. त्यामुळे वाहन चालकास अवैध वाळू वाहतूक करण्यावरून प्रांत अधिकारी विक्रमसिंह बांदल यांनी हटकले असता वाळू माफियांनी प्रांत बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात बांदल हे गंभीर जखमी झाले होते.
वाळूमाफियांच्या या वाढत्या मुजोरीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी कडक पावले उचलली. ते स्वतः वाळू तस्करी करून अवैध वाहतूक करणाऱ्या वाळू माफियाचा सिनेस्टाईल पाठलाग करत एका वाहनास गाडी आडवी लावून वाळूचा ट्रक अडवला. त्यानंतर शहरातील गणेश मंगल कार्यालय, बिलाडी रोड येथे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ट्रक ताब्यात घेतला. वाहन चालकाला तहसीलदार संजय शिंदे यांच्या ताब्यात देवुन कारवाईचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील वाळूमाफियांचे धाबे दणाणले असून अश्या कारवाया यापुढेही चालू राहतील अशी आशा सर्व सामान्य जनतेला वाटू लागली आहे.