महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यात पांझरा नदीच्या पुरामुळे मंगळवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाच्यावतीने आज (मंगळवार) देखील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली.

पांझरा नदी आणि शाळकरी विद्यार्थी

By

Published : Aug 6, 2019, 10:49 AM IST

धुळे - मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पांझरा नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. परिणामी नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील मुख्य मार्गावरुन पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज (मंगळवार) देखील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शनिवारी रात्रभर आणि रविवारी दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावली होती. यामुळे साक्री तालुक्यातील तसेच संपूर्ण जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. शिवाय पांझरा नदीवरील मध्यम प्रकल्प आणि जामखोली धरणामधील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे रविवारी तब्बल ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग पांझरा नदीत करण्यात आला. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शाळा-महाविद्यालयांना मंगळवारी देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डी. गंगानाथ यांनी त्यासंबंधित आदेश दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details