धुळे:धुळ्यात शनिवारच्या तापमानाची यंदाच्या मोसमातील निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. शनिवारी धुळ्याचं तापमान ५.५ अंश सेल्सिअस नोंद झाले आहे. 4 दिवसांत तापमान ८.७ ने खाली घसरले आहे. कडाक्याच्या थंडीचा जनजीवनावर परिणाम झाला. पहाटेच्या वेळी फिरणाऱ्यांचा तसेच व्यायाम करणाऱ्यांचा उत्साह कडाक्याच्या थंडीमुळे अधिकच वाढला.
आरोग्याची योग्य काळजी घ्यावी: थंडीचा कडाका वाढल्याने नागरिकांनी आरोग्याची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्राकडून करण्यात आले आहे. तर थंडीचा कडाका रब्बी पिकांसाठी विशेषतः गहू, हरबरा लागवडसाठी फायदेशीर असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार सांगतात.